“बीडकर धावणार”..! दीर्घायुषी व्हायचे असेल तर न चुकता पळा -: बालरोग तज्ञ डाॅ संजय जानवळे

0
131

बीडकर धावणार ! “Fitness journey”

दीर्घायुषी व्हायचे असेल तर न चुकता पळा -: बालरोग तज्ञ डाॅ संजय जानवळे..

 

पळणं, चालणं हा जगभर उत्तम व्यायाम मानला जातो. पळण्याने आयुष्य वाढतं, कर्करोग आणि ह्रदयाशी संबंधित आजारांनी होणाऱ्या मृत्युच्या धोक्याचं प्रमाण पळण्याने कमी होते.

पळण्याचा व्यायाम करणारे जर इतर शारीरीक व्यायाम करत असतील तर, त्यांच्या अचानक मृत्युच्या धोक्याचं प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी होतं.

जे नियमीत पळतात त्यांच्या बाबतीत कॅन्सर होऊन मृत्यू होण्याच्या धोका कमी होतो. पळण्याने ह्रदयाशी संबंधीत गुंतागुंत होऊन होणाऱ्या मृत्यूच्या धोक्याची प्रमाण थेट ४५ टक्के ते ७० टक्क्यांनी कमी होतं. पळण्याने मानसिक आरोग्य हे उत्तम राहते,

मेंदुसंबंधीत अल्झायमर, पाकिॅन्सन या या आजाराने मृत्यू होण्याच्या धोका कमी होतो. मन शांत रहाते; मनाची स्थिरता वाढते आणि संयम शक्तीही!
शरीराचा बांधा आखीव रेखीव राखण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी इतर कोणत्याही खेळापेक्षा, व्यायामपेक्षा पळण्याचा व्यायाम हा उत्तम. कमरेचा घेर कमी करण्यासाठी पळणं हा तर सर्वोत्तम पर्याय आहे.

१ जानेवारी , रविवार रोजी आपल्या सर्वांना नव्या वर्षाचं स्वागत रनिंग करुन करायचे आहे. गुरुकुल पब्लिक स्कूल, बीड बायपास येथून रन सुरुवात करुया. तुम्ही चाला, जाॅगिंग करा, धावा पण अंतर पुर्ण करा. मग ते ५ किमी, १० किमी अथवा २१ किमी असेल. स्ट्रावा (Strava) किंवा रनकिपर ( Runkeepar ) अॅप डाऊनलोड करा व तुमचं धावणं या पेजवर शेअर करा. चला तर मग तयारी करुयात..

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here