एसीबी ची धडाकेबाज कारवाई नारेवाडी चा सरपंच पुत्र एसीबीच्या जाळ्यात..
सरपंचपुत्र ने नारेवाडीचा
ग्रामसेवकाला पैसे द्यायचे म्हणून शेतकर्याकडून घेतले पैसे.. मागणी
नेकनूर (रिपोर्टर) नारेवाडीचा शेतकर्यास रोजगार हमी योजनेतून विहिर मंजूर झाली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या सिंचन विहिरीच्या कुशलचा चेक देण्यासाठी सरपंचपुत्राने शेतकर्याकडे पैशाची मागणी केली होती. तडजोडीअंती 20 हजार रुपये द्यायचे ठरले होते. 20 हजार रुपयांची लाच स्वीकाताना सरपंचपुत्राला आज सकाळी लाचलूचपत विभागा च्या पथकाने नेकनूरमध्ये रंगेहात पकडले. या प्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील नारेवाडी येथील एका 65 वर्षीय शेतकर्यास रोजगार हमी योजनेतून विहिर मंजूर झाली होती. या विहिरीचे कुशलचे पैसे राहिले होते. त्याचा चेक 1 लाख 8 हजार 312 रुपयांचा होता. हा चेक सरपंचाच्या सहीशिवाय वटत नव्हता. सरपंचपुत्र सुधाकर नंदू उगलमुगले याने चेकवर त्याची आई आशाबाई नंदू उगलमुगले यांची सही घेण्यासाठी पैशाची मागणी केली. हे पैसे ग्रामसेवक शिंदे यांना द्यायचे आहे, अशी बतावणीसुद्धा सरपंचपुत्राने संबंधित शेतकर्याकडे केली. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. हे 20 हजार रुपये आज सकाळी नेकनूर येथे कल्याणकर हॉस्पिटलसमोर देण्याचे ठरल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता 20 हजार रुपये स्वीकारताना सुधाकर नंदू उगलमुगले याला लाचलूचपत विभागाने रंगेहात पकडले. ही कारवार्स लाचलूचपत विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल धस, भारत गारदे, अविनाश गवळी, गणेश म्हेत्रे यांनी केली. या प्रकरणी आरोपीविरोधात नेकनूर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.