वर्षा अखेर वन विभागातील तब्बल तीन लाचखोर कर्मचारीवर एसीबी ची मोठी कारवाईची..

बीड (प्रतिनिधी) – सॉ मिल मधील लाकडी
मशिनचा परवाना 2023 चे नुतनीकरण करून कारवाई नकरण्या साठी 50 हजार रूपयांची लाच घेतांना
बीडच्या वन विभागातील दोन वनरक्षक आणि
एक चालक आणि अन्य एक अशा चौघांवर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी
कारवाई केली. वन विभागातील तब्बल तीन
लाचखोरांवर कर्मचाऱ्यावर एसीबीने कारवाईने
खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे ही संपूर्ण कारवाई जालना एसीबीने केली आहे. या प्रकरणात ए सी बी च्या टिमने तिघांना ताब्यात घेतले असुन एक फरार असल्याचे समजते.





