माननीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
आ. बाबाजानी दुर्राणी साहेबांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन…
पाथरी ,प्रतिनिधी/ इमरान खान/आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रियेविना अंधकारमय जीवन जगणार्या पाथरीतील सर्वसामान्य गोरगरिबांच्या जीवनात प्रकाश पडावा या हेतूने आपण नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीर घेतो. अनेक दिवसांच्या अंतरानंतर काल पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आ. बाबाजानी दुर्राणी साहेबांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. यामध्ये 150 पेक्षा जास्त जेष्ठ नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी केली. यापैकी 80 रुग्ण असे आढळले, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल. या सर्व रुग्णांना कालच उदयगीरी नेत्र रुग्णालय उदगीर येथे रवाना केले. यांच्यावर आ. बाबाजानी दुर्राणी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.
पाथरी शहरासह ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांची सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.