लातूर येथे आझमगंज गोलाई, परिसरातील पथ विक्रेत्यांची बैठक संपन्न..
लातूर, प्रतिनिधी/ आज रोजी दि 27डिसेंबर 2022 रोजी लातूर शहरातील गंजगोलाई भागात अतिक्रमणच्या बाबतीत बुलडोजर ने केलेल्या कारवाईच् नंतर सर्व व्यापारी बांधवांनी मौलाना सुजाउद्दीन फ्रुट मार्केट लातूर येथे आझमगंज गोलाई,लातूर परिसरातील पथ विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत पथ विक्रेत्यांना 2014 पासून 2022 पर्यंत झालेल्या प्रक्रियेतून सुरू झालेल्या फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात परिपूर्ण माहिती पथ विक्रेता समिती सदस्य गौस गोलंदाज यांनी दिली तसेच आजमगंज गोलाई परिसरात प्रशासनाने गोलाईच्या बाहेरील राउंडमधील डीव्हायडरच्या पलीकडील जागेत पथ विक्रेत्यास व्यवसाय करण्यास जागा उपलब्ध केली आहे तरी पथविक्रेत्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचा विरोध न करता या ठिकाणी व्यवसाय करावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे मार्गदर्शन केले
तसेच या वेळी पथविक्रेत्यांनी आपली बाजू व म्हणणे मांडले यामध्ये त्यांनी उपलब्ध जागेत ते व्यवसाय करण्यास तयार असल्याचे सांगितले परंतु जागा वाटप हे लॉटरी पद्धतीने करण्यात यावे ,कुणाच्याही दबावाखाली किंवा वशिल्याखाली होऊ नये अशी मागणी केली त्यावेळी त्यांना ही बाब प्रशासनाकडे मांडण्याचे आश्वासन देण्यात आले.
या वेळी बैठकीत गौस गोलंदाज,हमीद खान,अफजल कुरेशी,बरकत काझी,हाजी शब्बीरसाब बागवान यांनी मार्गदर्शन केले तसेच यावेळी मधुकर काळदाते,मज्जीद बागवान,खुदबोद्दीन (बाबा),किशोर कांबळे,शेख अब्दुल्ला,करीम तांबोळी,सत्तार बागवान,हमीद चाकूरकर आदी मान्यवर उपस्तिथ होते तसेच बहुसंख्य पथ विक्रेते उपस्तिथ होते.