नागापूर ग्रा.पं.वर महिला राज सरपंचपदी सुमेधा साळुंके तर उपसरपंचपदी आशेफाबी शफीक पठाण…
बीड (प्रतिनिधी): तालुक्यातील नागापूर खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशेफाबी शफीक पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आशेफाबी यांच्या निवडीने नागापूरमध्ये प्रथमच मुस्लीम महिलेला उपसरपंच होण्याचा मान मिळाला आहे. तालुक्यातील नागापूर खुर्द येथील सरपंचपदाच्या सुमेधा नारायण साळुंके हे थेट जनतेतून निवड असल्यामुळे सरपंचपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला सरपंचपदासाठी मान मिळाला.मात्र यामध्ये सदस्यपदाचे जे महत्व होते ते राहीले नाही असे म्हटले जात होते. मात्र उपसरपंच ही निवड देखील प्रतिष्ठेची मानली जाते. सरपंचपदाचा निकाल लागल्यानंतर बीड जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकार्यांना सूचना देऊन उपसरपंचाच्या निवडी आठ दिवसात कराव्यात असे आदेश दिल्यानंतर आज उपसरपंच म्हणून आशेफाबी शफीक पठाण यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडीमुळे नागापूरमध्ये फटाक्याची आतीषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य ज्ञानेश्वर साळुंके, कु.पुजा ताराचंद साळुंके,श्रीमती भागेत्री बाबासाहेब साळुंके,अलीम खॉं हासन खॉं पठाण हे सदस्य निवडून आले. यावेळी सुमेधा साळुंके म्हणाल्या की गावच्या विकासासाठी आहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी भागवत वाघ,तर ग्रामविकास अधिकारी करपे उपस्थित होते. यावेळी सरपंच,उपसरपंच यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.