रक्ताचे नाते नसतांनाही बेघरांना मदत करणार्‍या जिव्हाळा केंद्राच्या मदतीसाठी पुढे या-:वसंत मुंडे

0
112

रक्ताचे नाते नसतांनाही बेघरांना मदत करणार्‍या जिव्हाळा केंद्राच्या मदतीसाठी पुढे या-: वसंत मुंडे ..

एकही बेघर उपाशी झोपू नये याची जबाबदारी पत्रकार संघाने वसंत मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त स्वीकारली

बीड(प्रतिनिधी)-कसलेही रक्ताचे नाते नसतांना रस्त्यावर फिरणार्‍या बेघरांना, मनोरुग्णांना ज्यांच्या जवळून जाताना आपण नाक दाबतो अशा व्यक्तींची सेवा आनंदाने करणार्‍या जिव्हाळा बेघर निवारा केंद्राच्या व्यवस्थापनाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. आज सरकारने बेघरांना देण्यात येणारे जेवण बंद केले आहे. त्यामुळे येथील लाभार्थ्यांना उपाशी झोपण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. एकही व्यक्ती उपाशी झोपू नये याची जबाबदारी पोट भरलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वीकारली पाहिजे. यासाठी पत्रकार संघ जबाबदारी स्वीकारत असल्याचे पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी जाहीर केले.

 

बीड शहरातील भाजी मंडई येथील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांसमवेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा वाढदिवस रविवार दि. 1 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर, अ‍ॅड.चंद्रकांत नवले, कलंदर पठाण, संपादक बाबा देशमाने, संपादक गंगाधर काळकुटे, शेखर कुमार, पसायदानचे गोवर्धन दराडे,  पत्रकार बालाजी तोंडे, गुलदाद पठाण, पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, पत्रकार संघाचे शेख वसीम, अमजद पठाण, रईस खान, शेख आय्युब, शेख ताहेर, प्रतिभाताई गणोरकर, आत्माराम वाव्हळ, नामदेव वाघ, नवनाथ माने, भास्कर इप्पर, शेख इरफान, शैलेश गोलांडे, शिवप्रसाद सिरसाट, सामाजिक कार्यकर्त्या शेख शाकेरा मॅडम, जिव्हाळा केंद्राचे व्यवस्थापक राजू वंजारे, संस्थेचे सचिव अभिजीत वैद्य, काळजीवाहक शालीनी परदेशी, कल्याण गोरे, यश वंजारे, सुजाता कांबळे, योजना स्वामी, कोमल राजपूत, ज्योती शिंदे, संगीता गायसमुद्रे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना वसंत मुंडे म्हणाले, जीवनाचा शेवट हा मृत्यु आहे. जाताना सर्व येथेच सोडून जायचे आहे. याचे वास्तव प्रत्येकाने स्वीकारणे गरजेचे आहे. जीवन जगतांना इतरांनाही काही देता आले पाहिजे. ही मानसिकता प्रत्येकाने जोपासणे गरजेचे आहे. गरजवंतांच्या सेवेतून परमार्थ ज्याला साधता आला त्याचे जीवन सफल झाले. जर आयुष्य यशस्वी करायचे असेल तर आपल्या शेजारचा उपाशी झोपू नये याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळेच आम्ही जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला परिपूर्ण मदत करण्याचा निर्णय घेत आहोत असे जाहीर केले.

या प्रसंगी पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर यांनी केवळ घोषणा नको, प्रत्यक्ष मदतीचा हात जिव्हाळा बेघर केंद्राला देणे गरजेचे आहे. याची सुरुवात मी माझ्या स्वतःपासून करतो. जिव्हाळा केंद्राला मी व माझ्या पत्नीच्या नावे दरमहा प्रत्येकी दोनशे रुपये मदत आजपासून देत आहे. इतरांनी देखील पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. या प्रसंगी अ‍ॅड.चंद्रकांत नवले, संपादक गंगाधर काळकुटे, वैभव स्वामी आदिंनी मनोगत व्यक्त केले. अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व लाभार्थ्यांना जेवण देऊन वाढदिवस सोहळ्याची सांगता एका सामाजिक उपक्रमाने झाली.

नेत्र तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ.राधेश्याम जाजू यांच्या डोळ्यांच्या दवाखान्यात मोफत नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराला पत्रकार त्यांचे कुटुंबिय आणि जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबीरामध्ये पाच जणांना डोळ्याची गंभीर समस्या असल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या डोळ्यावर महागडी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने पत्रकार संघ पुढाकार घेऊन त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया दानशुरांच्या मदतीने लवकरच करणार आहे.

मदतीसाठी हात सरसावले
जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक राजू वंजारे यांनी केंद्रात साठ पेक्षा जास्त लाभार्थी असुन ते कष्ट करुन पोट भरू शकत नाहीत. या सर्वांना उपाशी झोपताना पाहवत नाही म्हणून आम्ही तीनशे दाते निवडणार आहोत. या दात्यांनी दरमहा किमान दोनशे रुपये प्रत्येकी द्यावेत अशी अपेक्षा आहे. या आवाहनाला पत्रकार संतोष मानूरकर यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन स्वतःसह आपल्या धर्मपत्नीच्या नावे सभासदत्व स्वीकारले. तसेच यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, अ‍ॅड.चंदक्रांत नवले, कलंदर पठाण, गंगाधर काळकुटे, बाबा देशमाने, वैभव स्वामी, प्रतिभा गणोरकर यांनी दोनशे रुपये प्रत्येकी या प्रमाणे सभासदत्व स्वीकारले असुन वसंत मुंडे यांनी जेवढे सभासद कमी पडतील ती संख्या पूर्ण करण्याची जबाबदारी पत्रकार संघ घेईल असे जाहीर करुन जिव्हाळा केंद्राला आत्मविश्‍वास दिला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here