बीडच्या विकास कामा साठी नगराध्यक्ष क्षीरसागर यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढच्या आठवड्यात भेटण्याचे दिले आश्वासन .

0
121

बीडच्या विकास कामांसाठी पुढच्या आठवड्यात भेटण्याचे आश्वासन

नगराध्यक्षांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट…

बीड दि.31(प्रतिनिधी)ः- शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करत आणि पुढील विकास कामांची मंजुरी मिळावी यासाठी माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता बीडच्या विकास कामांबाबत पुढच्या आठवड्यात भेट घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

बीड शहरात भुयारी गटार योजना आणि अमृत अटल योजना या दोन महत्त्वाकांक्षी योजनांना मंजुरी मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला तसेच बीड शहरातील नवीन डीपी रस्त्यांसाठी देखील त्यांनी मंजुरी दिली तर उर्वरित विकास कामे व्हावीत यासाठी देखील त्यांनी ठोस आश्वासन दिलेले आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचा बीड शहराच्या विकास कामांमध्ये सातत्याने पाठपुरावा असतो दि.31 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड शहरात आले असता नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी हेलिपॅडवर जाऊन त्यांची भेट घेतली.

बीडसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले तर उर्वरित विकास कामांना मंजुरीसाठी पुढील आठवड्यात मुंबईला भेट घेण्याचे आश्वासन दिले आहे. बीड शहरात सध्या नवीन डी.पी. रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून यापूर्वीही सोळा रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील विकास कामांसाठी देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवल्यामुळे शहराची विकास कामे पूर्ण होतील, यावेळी माजी नगरसेवक गणेश वाघमारे, गिरीश देशपांडे हेही उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here