सोयगाव येथील योगेश बोखारे यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्काराने औरंगाबाद येथे सन्मानित…
सोयगाव,दि.२ (प्रतिनिधि मुश्ताक शहा) औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावीऔरंगाबाद व माणुसकी रूग्णसेवा समुह,शासकीय रुग्णालय घाटी औरंगाबाद,यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सु लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष सुमित पंडित यांनी आयोजित केलेला सेवा गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
औरंगाबाद येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या पुरस्काराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, डॉ.कैलास झीने,उद्योजक संजय सोनवणे,ह.भ.प.भगवान महाराज जंजाळ,यांच्या हस्ते देण्यात आला असून यावेळी विविध प्रमुख पाहुणे उपस्थित होते,तर प्रमुख उपस्थिती सिद्धार्थ सोनवणेे बनोटीकर,ज्युनिअर चार्ली चपीयन उपस्थित होते.