” सिल्लोड महोत्सव 2023″ अंतर्गत सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते थाटात सुरुवात…
सिल्लोड ,प्रतिनिधी /युसुफ खान/सिल्लोड महोत्सव 2023 अंतर्गत सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते थाटात पार पडला.
यावेळी कृषी आयुष्य सुनील चव्हाण, प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक, समनव्यक समितीचे स्वागताध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, नॅशनल सूतगिरणीचे संचालक तथा क्रीडा महोत्सव समनव्यक समितीचे स्वागताध्यक्ष अब्दुल आमेर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे , श्रीराम महाजन, नंदकिशोर सहारे, केशवराव तायडे, प्रभाकर काळे, केतन काजे, स्वराजचे संचालक प्रमोद सरकटे, स्वराज सरकटे आदींची उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन व गणेश वंदनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध संगीतकार, गायक अजय – अतुल यांचा कार्यक्रम सादर झाला. यावेळी प्रेक्षकांच्या उपस्थितीने नगर परिषद प्रशालेचे संपूर्ण मैदान फुल भरले होते. उपस्थित रसिक प्रेक्षक अजय – अतुल व टीमच्या बहारदार सादरीकरणाने संगीताच्या अविष्कारात न्हाऊन निघाले.