शासकीय विश्रागृह दुरुस्त करून चालू करावे… सुरेश पाटोळे..
पाटोदा ,प्रतिनिधी(गणेश शेवाळे) तालुक्यातील सौताडा हे गाव तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून या भागात रामेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. खोल दरीत कोसळनारा नयनरम्य धबधबा असल्याने या ठिकाणी देश- विदेशातून अनेक पर्यटक धबधबा पाहण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. या ठिकाणी शासकीय विश्रामगृह आहे परंतु व्यवस्थापनासाठी कर्मचारी नसल्याने या ठिकाणी स्वच्छ्ता राखली जात नाही. त्यामुळे जी काही दुरूस्ती असेल ती करून व्यवस्थापनासाठी व देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी पाटोदयाचे नायब तहसीलदार इंद्रजित गरड यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून या विश्रामगृहाची अवस्था अतीशय बिकट झाली आहे. म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे या विश्रामग्रहाची जी काही दुरुस्ती असेल ती करून व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. आणि इतर ठिकाणच्या यात्रेकरूंना शासकीय विश्रामगृहाचा वापर करणेसाठी सहकार्य करावे. ज्या शासनाला आर्थिक फायदाही होईल आणि येणाऱ्या पर्यटकांचा वेळ व पैसा वाचवायचा मदत होईल यासाठी सौताडा येथील शासकीय विश्रागृहाची दुरुस्ती करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणीही सुरेश पाटोळे यांनी केली आहे.