सिंदफणा अर्बनच्या दिनदर्शिकेचे तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या हस्ते प्रकाशन

0
113

सिंदफणा अर्बनच्या दिनदर्शिकेचे तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या हस्ते प्रकाशन..

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य..

शिरुर कासार:-दि.3(समीर शेख) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधुन सिंदफणा अर्बन बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मंगळवारी तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती पोलीस उपनिरीक्षिक औदुंबर मस्के,अँड.भारत जायभाये,प्राचार्य आप्पासाहेब येवले यांचेसह बँकेचे संस्थापक आजीनाथ गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षण क्षेत्रात महिलांनादेखील हक्काचे शिक्षण घेता यावे यासाठी मोठी क्रांती करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत घरोघरी तेवत तेवली म्हणूनच आज सर्वत्र त्यांची जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते.तोच धागा पकडुन सिंदफणा अर्बन बँकेत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.

तिथी,वार,नक्षत्र,जयंती,पूण्यतिथी,यात्रा,सण,उत्सव,अमावस्या,पोर्णिमा अशि तारीखवार सविस्तर माहीती असलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सिंदफणा अर्बन चे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांनी मान्यवरांचा शाल,श्रीफळ देऊन व फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविकात गवळी यांनी सावित्रीमाईंचा जीवनपट सांगून आपल्या बॅंकेमार्फत सर्व स्तरातील जनतेला पूरेपूर लाभ कसा देण्यात येईल याचाच प्राधान्याने विचार केला जातो असे सांगितले.यावेळी तहसीलदार श्रीराम बेंडे,पोलीस उपनिरीक्षिक औदुंबर मस्के,बँकेचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी,अँड.भारत जायभाये,प्राचार्य आप्पासाहेब येवले,व्हाईस चेअरमन सुरेंद्र भांडेकर,संचालक रमेश जरांगेसर ,बबनराव सुरे,पत्रकार विजयकुमार गाडेकर,प्रकाश साळवे,महादेव कातखडेसर,घोडके साहेब,हानुमान बनकर शेवटी आभार शाखा ०यवस्थापक आकाश काकडे यांनी मानले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here