बीड (प्रतिनिधी) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शहरातील केएसपी विद्यालयात दि.03/01/2023 रोजी साजरी करण्यात आली यावेळी आले.यावेळी प्रमुख पाहुणे प्रमिलाकाकू शेळके, तनयकुमार शेळके, शाळेचे प्र.मुख्याध्यापक सुपेकर विशाल यांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी मनोगतामध्ये व्यक्त होतांना म्हटले की, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे भारतातील महिलांना आज शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि त्यामुळे आज कुठे स्त्री ही शिक्षित झाली आणि प्रगती करु लागली सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच स्त्रीयांना शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती येडे यांनी तर सुत्रसंचालन सौ.रोहिणी जोगदंड यांनी केले.आभार जगताप रत्नदीप यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण व नृत्य सादरीकरण केले.
या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थिती होती.