महाराष्ट्र भ्रष्टाचार विरोधी महिला अध्यक्ष जकीया बानो सय्यद साबेर यांना “समाज गौरव” पुरस्काराने सन्मानित…
औरंगाबाद ,प्रतिनिधी / खतीब अब्दुल सोहेल
सु.लक्षमी बहुऊद्देशीय सेवा भावी संस्था या संघटने मार्फत जकीया बानो सय्यद साबेर हे 17.वर्षा पासुन पोलीस सा.महिला सुरक्षा समिती मधे समाज सेवा म्हणुन काम करत आहे व सध्या सिटी चौक पोलीस ठाणे येथे अध्यक्षा म्हणुन समाज सेवा करत आहे
तसेच महिला तक्रार निवारन केंद्र सदस्या आहे येथे दैनंदिन जीवनामध्ये पती-पत्नीचे घरातील भांडण नवरा बाईको ला समोर देश देऊन त्या दोघांमधील गैरसमज दूर करणे व भांडणे सोडवुन दोन तीन वेळा त्यांची समजुत घालुन त्यांचे संसाराचे गाडा सुरळीत लालवणे व प्रापंचिक अडचण दूर करणे अशी अनेक समाजसेवेत अग्रेसर आहे.तसेच कौटुंबिक न्यायालय येथे सदस्य म्हणुन काम करत आहे.
हि समाज सेवा पाहुन यावर्षी संस्थेने त्यांच्या केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन संस्थे मार्फत समाज गौरव पुरस्का देऊन सन्मानीत करण्यात आले जकीया बानो याना आज हा 19.वा पुरस्कार मिळाला आहे.या बद्दल सर्व स्थरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.