धनंजय मुंडे यांचे वाहनाचा अपघात कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान..
धनंजय मुंडेंन यांची तब्येत चांगली … विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला..
बीड /प्रतिनिधी/चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्या असताना वाहनाचा एक्सीडेंट झाला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला परळीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला आहे. यामध्ये मुंडे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईला हलविले जाणार आहे.
परळी शहरातील मौलाना आझाद चौकात हा अपघात झाला आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी आणि कामे आटपून धनंजय मुंडे घरी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला आहे. याची माहिती धनंजय मुंडे यांनीच सकाळी दिली होती.
धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पुढील उपचारासाठी मुंडे यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात नेले जाणार आहे. यासाठी लातूरहून एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली जाणार आहे. काळजी करण्यासारखं काही नाही कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंडे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.