नांदुर घाट येथील शेख सिकंदर अब्दुल यांचा कुरकुंभ येथे सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न.

0
127

नांदुर घाट येथील शेख सिकंदर अब्दुल यांचा कुरकुंभ येथे सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न.

नेकनूर (प्रतिनिधी) नांदूर घाट येथील रहिवाशी व 29 वर्षे सेवा करणारे शेख सिकंदर अब्दुल यांचा सेवापूर्ती कार्यक्रम कुरकुंभ येथील फिरंगाई माता महाविद्यालय कुरकुंभ,जि.पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्कर्ष शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशवराव आनंदराव शितोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून कुरकुंभ गावचे सरपंच, माजी विद्यार्थी राहुल दादा भोसले, उपसरपंच विनोद शितोळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

तसेच इतर मान्यवरांमध्ये संस्था
सचिव सचिन शितोळे
कार्याध्यक्ष अनिल शितोळे तसेच शाळेचे प्राचार्य भापकर सर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यात त्यांनी शेख सिकंदर सर यांच्या 29 वर्ष 11 महिने 11 दिवस केलेल्या सेवेचा गौरव उल्लेख करून आजपर्यंतच्या इतिहासात असा कोणीही शिक्षक नाही जो शेवटच्या दिवसापर्यंत आपली सेवा या कामी खर्च करणारा याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा मुजावर एस.टी. यांनी सिकंदर शेख सरांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, वेळेचे महत्व ठेवल्यामुळेच आज माजी विद्यार्थी शेकडो प्रमाणात या सेवापूर्ती कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते

असा कार्यक्रम न भूतो न भविष्यति अशा पद्धतीचा झाल्याचा दिसून आला. तसेच सेवानिवृत्त शिक्षक सिकंदर सर यांची घोड्यावर बसून देखील माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य अशी मिरवणूक गाजत वाजत काढली. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणि सुखाचा क्षण ही याप्रसंगी दिसून आला.
सिंकदर शेख सरांचे नातेवाईक, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी, संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

सत्कार मूर्ती सिंकदर सर सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, आणि ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबरोबर विद्यालयाच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन बध्द पद्धतीने आपल्या शैलीमध्ये कार्य बजावले.
प्रास्ताविक प्राचार्य भापकर सर यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.मुजावर एस.टी., माजी मुख्याध्यापक गुलाम दस्तगीर शेख, डॉ मुक्तार शेख, पत्रकार जावेदभाई शेख, तारळकर , शिवाजी जाधव, सुभाष झाडबुके, इंजि. अन्सार शेख
सूत्रसंचलन शिंदे सर, शितोळे सर यांनी केले व
शेवटी आभार ससाने सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील नागरिक माजी विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य, विविध मीडियानेही या कार्यक्रमाची दखल घेत टीव्ही 9 मराठी, झी 24 तास, लोकशाही न्यूज, तसेच माऊली न्यूज यांनी या कार्यक्रमाची दखल घेतली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here