लोकसेना संघटनेची पुणे कार्यकारिणी घोषीत शहराध्यक्षपदी सय्यद अमीन यांची निवड..
बीड प्रतिनिधिि -: कांग्रेस पक्षाचे पुणे शहराचे माजी अध्यक्ष व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सय्यद अमीन मुश्ताक यांची लोकसेना संघटना पुणे शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सोबत शौकतहुसैन दादामियाँ शेख यांना लोकसेना संघटनेच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड, शाहरुख सलीम शेख यांना लोकसेना संघटनेच्या पुणे शहर सरचिटणीसपदी निवड तर हालिमा बाबू शेख यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी करुन सर्व नवनिर्वाचित टीमचे ॲड. प्रा. इलियास इनामदार, मिर्ज़ा खैसर बेग, सुफियान मणियार, प्रा. संजय खांडेकर, ॲड. कलीम काज़ी, शेख अयाज़ अखतर, शेख समीर, शेख अफ्फान, सालेम शेख, रज़ी भैय्या इत्यादीन्नी अभिनन्दन करुन पुढील कार्यास सुभेच्छा दिल्या सर्व पदाधिकारी यांनी लोकसेना संघटनेच्या माध्यमाने पुणे शहरामध्ये समाजाच्या प्रश्नावर काम करू समाजाला लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू सामाजिक राजकीय कार्य करू व संघटना वाढिस प्रयत्न करू अशी गवाही सर्वांनी दिली.