काळया बाजारात रेशनचा गहू विक्रीच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मा.श्री एन.सी.बोरफळकर साहेब यांच्या न्यायालयाने रे.फौ. खटला क्रमांक 118/2009 मधील आरोपीची दि.02/01/ 2023 रोजी निर्दोष मुक्तता केली. आरोपी श्रीमंत मनोहर शिंदे याचे तर्फे अँड.आर .एम.धायगुडे यांनी काम पाहिले. प्रकरणाची थोडक्यात हकीगत की, प्रकरणातील फिर्यादीने फिर्याद दिली की,मी शेषराव मेघा राठोड,पो.उप.निरीक्षक पोलीस स्टेशन बर्दापूर ता.अंबाजोगाई. सरकार तर्फे फिर्याद लिहून देतो की मी वरील पो.स्टे.ला पो.उप.निरीक्षक म्हणून नेमणुकीस आहे. दिनांक 10/12/2009 रोजी 23 वा. चे सुमारास फोन द्वारे सोपान शेषराव तोंडे रा.चोपनवाडी यांनी कळवले की माझे वाकडी शिवारातील शेताचे शेजारी गंगाधर घुले यांचे शेतात एक टेम्पो गव्हाचे कट्टे- पोते दिलीप कांदे यांचे शेतात राशनचा गहू उतरवून उभा टाकलेला आहे. टेम्पोचा नंबर एमएच. 14 व्ही 12 असा आहे व टेम्पोचा चालक व मालक आम्हास पाहून पळून गेले आहेत तरी तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनची गाडी कर्मचाऱ्यासह पाठवा असे कळवल्या वरून आम्ही पो.स्टे.ची गाडी घेऊन कर्मचाऱ्यासह घटनास्थळी गेलो असता टेम्पोचे चालक व मालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्या ठिकाणी आम्ही 50 किलो वजनाचे 58 पोते व टेम्पो जप्त केला व आरोपी श्रीमंत मनोहर शिंदे,नवनाथ एकनाथ गायकवाड, महादेव श्रीपती खंडागळे ,यांचे विरुद्ध गु.र.क्रमांक 3017/2009 कलम 3,7 जीवन आवश्यक वस्तू प्रतिबंधक कायदा प्रमाणे नोंद केला. प्रकरणात तपासाअंती दोषारोप पत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे दाखल झाले. त्यास रे.फौ. खटला क्रमांक 118/2011 प्रमाणे नोंद झाल. प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी श्रीमंत मनोहर शिंदे याचे तर्फे अँड.आर.एम. धायगुडे यांनी काम पाहिले. उपलब्ध कागदपत्र व पुराव्यावरून आरोपीस मा. न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आरोपीतर्फे अँड. आर.एम.धायगुडे यांनी काम पाहिले तर त्यांना अँड.जी.डी. कांदे,अँड.डी.ए. लोंढाळ, अँड.एस.एन. रुपनर,अँड.अविनाश धायगुडे यांनी सहकार्य केले….