शिवसेनेचे रतन गुजर यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार
बीड (प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बीड तालुक्यातील जाटनांदूर येथील शिवसेनेचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्काराचे आयोजन शिवसेनेचे जिल्हासंघटक रतन गुंजर यांनी केले होते. यावेळी विजयी सरपंच, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला.
जाटनांदुर येथे शिवसेना बीड जिल्हा संघटक श्री.रतन गुजर यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सभापती सुनिल चौधरी, माजी सरपंच हनुमंत डोंगर, विद्यमान सरपंच पती सचिन माने, ग्राम पंचायत सदस्य संजय डोंगर, संतोष डोंगर ,संतोष वाल्हेकर, स्वतः धान्य दुकानदार विठ्ठल डोंगर, डाँ सुरेंद्र पारखे सह गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.