लोकरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने शेख जेबा सन्मानित
बीड (प्रतिनिधी) – शहरातील समाजसेविका झेबा अब्दुल कदिर शेख यांना त्यांच्या विविध कार्याची दखल घेवून पुरोगामी पत्रकार संघ आणि महिला विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा लोकरत्न राज्यस्तरीय पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला.
सौ .झेब अब्दुल कदिर शेख (समाजसेविका) यांनी विविध प्रश्नी सामाजिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांचा प्रश्नावर कलेक्टर साहेबांना निवेदने देऊन असे वेगवेगळे मुद्दे उचलले आणि मार्गी पण लावली ऊसतोड कामगार गरीब मुलं-मुली अल्पसंख्याक समाजातील मुल मुली यांना पोलीस भरती पूर्वतयारी मोफत परीक्षा देणे, उद्योगासाठी महिलांना स्वालंबी करणे, कौटुंबिक हिंसाचार मध्ये कौन्सिलिंग करून घेणे, उर्दू शिक्षक संघटनेचे ( संघटक), मार्शल आर्ट फेडरेशनचे शिकरण फेडरेशनचे महाराष्ट्र प्रेसिडेंट पद , पोलीस हक्क संरक्षण संघटनाचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख पदी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी खूप नाव कमवलेला मुलींना सेल्फ डिफेन्स साठी शाखा पण ओपन केले .अल्पसंख्याक मुलींना शिक्षणासाठी जागरूकता करणे असे भरपूर कार्यक्रम राबविले त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना लोकरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.