अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्षपदीमाजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची बिनविरोध निवड…
बीड दि.4 (प्रतिनिधी) – अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
उज्जैन येथे अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात सर्व समाज बांधवांनी एकमुखाने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करावी अशी एकमुखी भूमिका घेतली. मागील काळात अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देशभर तेली समाजाच्या बंधू – भगिनींना एकत्रित करून संघटन बांधणी केली.
तेली समाजाचे विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, समाजाला पुढे नेण्यासाठी दिशादर्शक मेळावे असे अनेक कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राबविले होते.त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.