पाटोद्यात पञकार संघाच्या वतीने पञकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
120

पाटोद्यात पञकार संघाच्या वतीने पञकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

पाटोदा,  प्रतिनिधी/गणेश शेवाळे/ ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिना निमित्त महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन घोषित केला आहे. राज्यात 6 जानेवारी हा दिवस पञकार दिन म्हणून साजरा केला जातो.बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार होते. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.भाषेत गोविंद कुंटे (भाऊ महाजन) यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला.

जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्त्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते.

प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले यामुळे 6 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिना निमित्त महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन
घोषित केला असल्यामुळे पाटोदा पञकार संघाच्या वतीने पञकार दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला

 यावेळी पाटोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे, ज्येष्ठ पत्रकार अरुण कुलकर्णी, बळीराम जायभाय, पोपटराव राऊत,अजिज शेख, विजय जाधव,पोपट कोल्हे, बाजीराव जाधव, महेश बेदरे,शेख महेशर, इम्रान सय्यद,गणेश शेवाळे,राहुल सोनवने,सुधीर एकबोटे,अमोल जोशी,प्रदिप मांजरे,दत्ता वाघमारे,सचिन शिंदे,यांच्या सह आदी पञकार उपस्थित होते यावेळी जेष्ठ पत्रकार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश बेदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोपट कोल्हे यांनी मानले

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here