महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे.यांनी आयोजित केलेल्या. स्कॉलरशिप परिक्षेत बीड ची .”अक्षरा आशुतोष नाईकवाडे’ ही राज्यात पहिली
बीड, प्रतिनिधी- :महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे. यांनी आयोजित केलेल्या. स्कॉलरशिप परिक्षेत बीड शहरातील इयत्ता सहावीची विद्यार्थीनीने स्कॉलरशिप परिक्षेत नेत्रदीपक कामगिरी करत शहरी भागातून राज्यातून पहिली आली. या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत असून, अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यात सेवा बजावत असलेले आशुतोष नाईकवाडे यांची कन्या अक्षरा आशुतोष नाईकवाडे ही बीड येथील एका शाळेत इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे पुर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवीची परिक्षा मागील वर्षी ३१ जुलैला घेतली आहे. या परिक्षेत अक्षरा सहभागी झाली. तीन आपले कौशल्य व अभ्यासाच्या जोरावर नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्कॉलरशिप परिक्षेत सीबीएससी आयसीएससी मधून शहरी भागातून महाराष्ट्र राज्यातून पहिली येण्याचा मान पटकावला आहे. या यशाबद्दल अक्षराचे नातेवाईक, शिक्षक यांच्यासह आदींनी का मार्फत सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.