लोकशाही राष्ट्रवादी मोर्चा या राजकिय पक्षाच्या मराठवाडा अध्यक्षपदी अॅड. बक्शु अमीर शेख.
बीड (प्रतिनिधी) दि. 05 : देशामध्ये लोकशाही भारत व लोकशाही समाज निर्मितीचे कार्य करणारा एकमेव राजकीय पक्ष ‘लोकशाही राष्ट्रवादी मोर्चाच्या’ मराठवाडा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अॅड. बक्शु अमिर शेख यांची नियुक्ती पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आनंद मोहन यांनी केली.
आहे.आतापर्यंत भारत देशा मध्ये हिंदुत्ववाद, बहुजनवाद, गांधीवाद, समाजवाद या साऱ्या विचारधारा च्या राजकीय पक्षांनी काम केले आहे पंरतु लोकशाही राष्ट्रवादावर कोणीही काम न केल्याने देशात वेगवेगळ्या विचारधारा मध्ये टोकाचा द्वेष निर्माण होऊन स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर ही अपेक्षीत यश मिळाले नाही.
देशात भाईचारा वाढला नाही. भारतीय नागरिकाच्या मुलभूत समस्या सोडवण्यासाठी आलेल्या प्रत्येक सरकारला अपयश आले. याचे मुळ कोणत्याही राजकीय पक्षाने लोकशाही राष्ट्रवादाचे वातावरण निर्माण केले नाही हे आहे . म्हणून देशातील लोकशाही राष्ट्रवादी विचारांच्या व बामसेफ च्या एका मोठ्या गटाच्या लोकांनी मा. जितेंद्र कुमार (दिल्ली), अॅड. रावसाहेब मोहन (मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन “लोकशाही राष्ट्रवादी मोर्चा” या राजकिय पक्षाची स्थापना केली आहे.
लोकशाही राष्ट्रवादी मोर्चा हा राजकीय पक्ष अखिल भारतीय असून महाराष्ट्रात मा. आनंद मोहन (मुंबई), मा. अर्जुन उजगरे याच्यां नेतृत्वाखाली कार्याला सुरुवात झाली आहे. या पक्षवाढीव मोहीमे अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते व मुक्त पत्रकार अॅड. बक्शु अमीर शेख यांची लोकशाही राष्ट्रवादी मोर्चा या राजकिय पक्षाच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अॅड. बक्शु अमीर शेख यांची निवड झाल्याबद्दल अॅड. पि. के. वीर, अंकुश चव्हाण, अॅड. झिंजुर्डे, अफरोज आतार आदींनी अभिनंदन केले असून त्यांचे मराठवाडय़ातील लोकांकडून स्वागत होत आहे.