टापरेवाडीच्या आदर्श सरपंच रेखाताई टापरे याना स्वराज सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय महिलांचा दृढभूषण पुरस्कार प्रदान ..

0
114

टापरेवाडीच्या आदर्श सरपंच रेखाताई टापरे याना स्वराज सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय महिलांचा दृढभूषण पुरस्कार प्रदान .

इसलामपूर /प्रतिनिधी/इकबाल पीरजादे/पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील टापरेवाडी गावच्या आदर्श सरपंच श्रीमती रेखाताई विद्याधर टापरे यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय महिला ढहभूषण पुरस्कार दिनांक 25 डिसेंबर 25 डिसेंबर रोजी माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहमदनगर येथे मान्यवरांच्या हस्ते सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समितीने श्रीमती टापरे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समाजातील उपेक्षित घटकांसाठी व कोरोना काळातील अत्यंत जोखमीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या साठी गावकऱ्यांसाठी समर्थपणे काम करणाऱ्या समाजातील निवडक लोकांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो त्याप्रमाणे रेखाताई यांच्या कामाचे मूल्यमापन करून भोर तालुक्यातील एक कर्तुत्व वान महिला म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे 

समाजातील विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे हे खऱ्या अर्थाने स्त्री असून कैलासवासी विद्याधर टापरे यांच्या प्रेरणेतून व कैलासवासी माधवराव टापरे यांच्या राजकीय वारसा यातून समाजकार्याची प्रेरणा त्यांना मिळाली त्याबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here